Supriya Sule: खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा; सुप्रिया सुळेंनी का केली मागणी?

Supriya Sule Demands For Sunil Tatkare Suspension: पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून केली असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, फैजला तुम्ही पाहिले की, आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि मगच फैजल या आमच्या लक्षद्वीपच्या खासदारांना न्याय मिळाला. आम्ही पक्षाच्या साठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं. त्या विधेयकाच्या वेळी उपस्थिती नव्हते. सुनील तटकरे यांच्या विरोधात पक्षविरोधी कृतीची याचिका करून आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटूनही गेला आहे. मात्र, अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी खंत सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावरील कार्यवाही इतक्या कालावधीपासून प्रलंबित आहे, कार्यवाही केली जात नाही, यामुळे शेड्युल (सूची) दहाचे उल्लंघन होत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला असता का? हे सर्व दुसऱ्यांच्या जीवावर चालले सगळे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि खचीकरण म्हणजे फक्त राष्ट्रीय पक्ष नाही. रोजगारामध्ये महाराष्ट्राचे देशात महत्व कसे कमी होईल, हे मोठे कट कारस्थान हे अदृश्य शक्ती दिल्लीवरून महाराष्ट्राच्या विरोधात काम करते. हे मी डेटानुसार सांगू शकते. मी त्यांच्यासारखे कधीही खोटे आरोप करत नाही. मी वास्तवतेत जगते. मी डेटानुसार सांगू शकते की, अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कशी आहे”, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता बघूया कालच निर्णय झालेला आहे जरांगे पाटलांच्या या सगळ्या संघर्षाला यश आलेल आहे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी त्यांना साथ दिली कार्यकर्ते, पदाधिकारी सहकार्यांचा मी मनापासून आभार मानते त्यांचे कौतुक करते आणि महाराष्ट्र सरकार कसं खोटे बोलत रेटून बोलतं याचा आणखीन एक उदाहरण आपल्या समोर आलेल आहे. पण मराठा समाज असेल धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज या सगळ्यांचे आरक्षणाचे मुद्दे अतिशय गंभीर आहेत आणि सातत्याने या संदर्भात महाराष्ट्राचे सरकार ट्रिपल इंजिन खोके सरकार एक बोलतो आणि दिल्लीतील सरकार दुसरं बोलतो असा अनुभव अनेक ठिकाणी मला आलेला आहे. पॉलिसी लेव्हला आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे. आज आंदोलकांनी मनाचा मोठेपणा दाखवत सरकारला दोन महिन्याचा कालावधी दिला त्यांचा मान राखत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुप्रीम कोर्ट स्पीकरच्या कामावर प्रचंड आश्चर्य आणि नाराजी व्यक्त करत आहे. आणि हे सर्व सगळ्यांनी लाईव्ह पाहिलेले त्यामुळे मी काही वेगळं तुम्हाला सांगत नाहीये त्यामुळे अर्थातच सुप्रीम कोर्ट हे महाराष्ट्र सरकार आणि स्पीकरवर प्रचंड नाराज आहे. देश नियम आणि कायद्याने चालतो अदृश्य शक्तींनी नाही चालत मग त्याला दडपशाही म्हणतात. परंतु ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिले हा देश संविधानांनी चालला पाहिजे चालत नसेल तर मला असं वाटतं आम्हाला संघर्ष करावा लागेल कारण न्याय मिळालाच पाहिजे सर्वसामान्य मायबाप जनतेने त्या संविधानावर विश्वास ठेवलाय प्रेम केलं आदर केला आमच राजकारण हे संविधानाने चालतं अदृश्य शक्तीच्या भीतीने चालत नाही असे सुप्रियाताई सुळे यावेळी म्हणाल्या. कोर्टाने दिवस मोजलेत स्वतःत मी दिवस मोजले तुम्ही जर पाहणी बघितली असेल तर त्यांनी हिशोब केला आहे. हे सरकार म्हणत आम्ही सुट्ट्या घेत नाही २४ तास काम करतो मग करा की, कोर्ट म्हणालं की, आमची एखादी बेंज एक महिन्यात करून देईल पण कोर्टाने तुम्हाला दोन महिने दिले असलायचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महागाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर अर्थातच या देशांमध्ये महागाई आणि बेरोजगारी सगळ्यात मोठी आव्हान आहे आणि याच्यावर मी अनेक महिने बोलत आहे. कांद्याबद्दल पहिला मुद्दा ही कांद्याची अडचण होणार आहे पॉलिसीमध्ये बदल आणा किंवा ४०% चा टॅक्स लावा असं मी म्हणाले असल्याचं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. फक्त कांद्याच्या बाबतीतच नाही दूध, तांदूळ, साखर असेल सगळ्या बाबतीत ही अतिशय चिंतेची बाब आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव चांगला दिला नसल्याचे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचं खच्चीकरण जर कोणी केलं असेल तर या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलं असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मी जे म्हणत होते एक महिन्यापासून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत त्यावर शिक्का मुहूर्त प्रकाश साळुंखे यांनी केला. आणि त्यांच्या या वक्तव्याचे मी मनापासून आभार मानते मी स्वतः त्यांना या सगळ्या प्रकारानंतर फोन केला होता मी मुश्री यांना देखील फोन केला होता आणि मी संदीप क्षीरसागर यांनाही फोन केला होता. अमरसिंह पाटील यांनाही मी फोन केला असल्याचं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. राजकारण एकीकडे पण माणुसकी टिकवली पाहिजे समोरच्या व्यक्तीकडे माणुसकी नाही म्हणून आपण माणुसकी दाखवायची नाही असं नसत. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपण कधी काळीसोबत काम केलं आहे. आणि जरी आपण केलं नसेल पण माणुसकी खातर असं वागणं चुकीचं असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्यावर सुसंस्कृत वरिष्ठ नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असल्यामुळे आम्ही राजकारण आणि माणुसकी कधीही एकत्र करणार नाही. आमची लढाई ही वैयक्तिक नसून वैचारिक असल्याचं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. त्यामुळे मी सोळंके यांच्या वक्तव्याचे समर्थन करते गेल्या महिन्याभरापासून मी देखील हेच वक्तव्य करत आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मी देखील करत आहे. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. जालन्यामध्ये ज्या पद्धतीने महिलांवर अमानुष अत्याचार करण्यात आला. आणि ते सगळं मीच नाही तर सर्वांनी पाहिलं आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मी मागणी करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी या वेळी सांगितले आहे.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे