Eknath Shinde Party Symbol : शिंदे गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Mumbai – निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena-Uddhav Balasaheb Thackeray) , असं नाव, तसंच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना(Shiv Sena of Balasaheb) हे नाव मिळालं आहे. तर पक्षाचं चिन्ह म्हणून ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ढाल तलवार हे चिन्ह मराठी माणसाच्या थेट काळजापर्यंत पोहोचणारे असल्याने शिंदे गट खुश झाला आहे.