Joint Replacement Surgery | जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि सांध्यांची काळजी

डॉ. विनायक घनाते,  – सांधेरोपण तज्ञ, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे – जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीद्वारे (Joint Replacement Surgery) गुडघ्याचा सांधा, खुब्याचा सांधा, खांदा वगैरे शरीरातील सांध्यांची झीज किंवा खराब झाले असल्यास ते बदलून त्यांच्याजागी सिरॅमिक, धातू किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेले कृत्रिम सांधे बसवता येऊ शकतात. ज्या लोकांना गंभीर स्वरूपाची सांधेदुखी (आर्थरायटिस) असते, काही इजा झालेली असते किंवा ज्यांना सांध्यांशी संबंधित काही अन्य समस्या असते, त्या लोकांना या शस्त्रक्रियेने बराच फायदा होतो. शस्त्रक्रियेचा उद्देश त्यांना होत असलेली वेदना कमी करणे, त्यांची चालण्याची क्षमता वाढवणे आणि सांध्यांचे एकंदर कार्य सुधारणे हा असतो.

जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी (Joint Replacement Surgery) करण्याची शिफारस सर्वसाधारणपणे, ज्यांना सांध्यांची सूज किंवा झीज झाल्यामुळे खूप वेदना होत असते, ज्यांचे सांधे आखडलेले असतात आणि ज्यांची चालण्या-फिरण्याची क्षमता कमी झालेली असते अशा लोकांना केली जाते. जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची सर्वसामान्य कारणे म्हणजे ऑस्टीओ आर्थरायटिस, संधिवात, फ्रॅक्चर कींवा दुखापती आणि सांध्यांच्या इतर काही समस्या.

जर एखादी व्यक्ती संधिवाताने ग्रासलेली असेल, तर जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी त्या व्यक्तीचे जीवन पालटून टाकू शकते. ही शस्त्रक्रिया अशा लोकांना पुन्हा उत्तम आयुष्य जगण्यास आणि कोणाच्याही मदतीशिवाय आणि वेदनेशिवाय आपली नियमित कामे करण्यास सक्षम करते. जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीचे यश हे शस्त्रक्रिया आणि फिजीयोथेरपी वर अवलंबून असते. शस्त्रक्रियेनंतर पुरेशी आणि योग्य देखभाल केल्यास रुग्ण लवकर बरा होतो आणि सांध्यांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. मग ती गुडघ्याची रिप्लेसमेंट असो किंवा खुब्याची.

शस्त्रक्रियेनंतर सांध्यांची योग्य काळजी घेण्यासाठी रुग्णाने काही महत्त्वपूर्ण निर्देशांचे पालन केले पाहिजे.

1. आपल्या डॉक्टरचा सल्ला पाळा: शस्त्रक्रियेनंतर बरे होत असताना आपल्या डॉक्टरचा सल्ला मानणे फार महत्त्वाचे आहे. शस्त्रक्रियेनंतरच्या सर्व सूचना पाळा, जशा की, औषधांच्या वेळा, जखमेची देखभाल करण्याची प्रक्रिया आणि हालचालीसंबंधीच्या मर्यादा. त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवा. आणि तुम्हाला काहीही प्रश्न किंवा चिंता असल्यास त्यांचा संपर्क साधण्यास संकोचू नका.

2. दैनंदिन आयुष्याची देखभाल करणे: शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवस दवाखान्यात राहावे लागते. गुडघ्याची किंवा खुब्याची शस्त्रक्रिया झाली असेल तर थोडी वेदना शस्त्रक्रियेनंतरही होते, जी औषधांनी नियंत्रित करता येऊ शकते. चालण्यासाठी काठी किंवा वॉकरची मदत घेता येऊ शकते. स्नायूंच्या ताकदीसाठी आणि हालचालीत सुधारणा करण्यासाठी फिजिओथेरपीची मोठी मदत होते, जी पूर्ण केली पाहिजे. जॉइंट रिप्लेसमेंटनंतर एक दिवसाच्या आत शारीरिक पुनर्वसन सुरू होऊ शकते.

3. नियमित फिजिओथेरपी करणे: जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीनंतरच्या देखभालीत फिजिओथेरपी एक महत्त्वाचा भाग आहे. रुग्णावर उपचार करणारा फिजिओथेरपिस्ट त्या रुग्णाच्या नवीन सांध्यातील ताकद, लवचिकता आणि हालचालींची व्याप्ती वाढवण्यासाठी व्यक्तीविशिष्ट असा ट्रेनिंग कार्यक्रम तयार करतो. पुनर्वसन जलद करण्यासाठी फिजिकल थेरपी सत्रांच्या बाबतीत नियमित रहा. आणि तुम्हाला सुचवण्यात आलेले व्यायाम नियमित करा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

4. आरोग्यवर्धक आहार घेणे: सांध्यांचे एकंदर आरोग्य जपण्यासाठी आणि शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी योग्य पोषक आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये फळे, भाज्या, लीन प्रोटीन आणि कडधान्ये मुबलक असतील. दिवसभर पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहा. कारण उतींच्या दुरुस्तीसाठी आणि रिकव्हरीसाठी योग्य हायड्रेशन आवश्यक असते.

5. नियमित फॉलो-अप: शस्त्रक्रियेनंतरची प्रगती तपासण्यासाठी आणि काही समस्या असल्यास त्या निवारण्यासाठी डॉक्टरची नियमित भेट घ्यावी. नवीन सांध्याची एकसंधता तपासण्यासाठी आणि बरे होण्याची प्रक्रिया योग्य गतीने होत असल्याची खात्री करण्यासाठी शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर एक्स-रे सारखे इमेजिंग परीक्षण करण्यास सांगू शकतो. निर्धारित अपॉइंटमेंटला अचूक हजर रहा आणि  हेल्थकेअर व्यावसायिकाशी प्रामाणिकपणे बोला.

6. शस्त्रक्रियेनंतरचे जीवन: शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यावर काही महिन्यांनी रुग्ण पूर्ववत आपली दैनंदिन कामे करू शकतो. शस्त्रक्रियेनंतर एखादा रुग्ण किती प्रमाणात हालचाली करतो त्यावर त्याचे झपाट्याने बरे होणे अवलंबून असते. अन्य महत्त्वाचे घटक म्हणजे, रुग्णाचे वय, समस्येचे गांभीर्य आणि एकंदर शारीरिक आरोग्य. त्या व्यतिरिक्त औषधोपचार, फिजिओथेरपी देखील मदतरूप ठरते.

या महत्त्वपूर्ण निर्देशांचे पालन करून रुग्ण लवकर बरे होऊ शकतात, त्यांच्या समस्या कमी होऊ शकतात आणि  जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीचा फायदा त्यांना मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’