अनिल कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी! एकट्या एजाझ पटेलनं घेतल्या सर्व 10 विकेट्स

मुंबई – टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेनं (Anil Kumble) पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी हा रेकॉर्ड पुन्हा पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण, भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) मुंबईत सुरू असलेल्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड पुन्हा पाहायला मिळाला आहे. न्यूझाीलंडचा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) हा ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.

एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. एजाजने एक-एक भारताचे दहा गडीना तंबूत पाठवलं. या कामगिरीसह एजाज पटेलनं अनिल कुंबलेचा विक्रमाशी बरोबरी केलीय. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडींना बाद केलंय. यात त्यानं 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्या आहेत.

या आधी जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.