भाजप हा पक्ष सध्या प्रतिगामी राहिलेला नसून तो पक्ष पुरोगामी झालाय – रामदास आठवले

औरंगाबाद : येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका आम्ही भाजपसोबत युती करून लढणार आहोत भारतीय जनता पार्टी हा पक्ष सध्या प्रतिगामी राहिलेला नसून तो पक्ष पुरोगामी झालेला आहे. असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.

तर, संविधान बदलण्याचा कुठलाही विषय नसून उलट संविधानाचं पालन भारतीय जनता पार्टी जास्त करते अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेनेने आता अडीच वर्ष सत्ता भोगली आहे तेव्हा त्यांनी भाजपला संधी द्यावी आणि भाजपसोबत येऊन पुन्हा एकदा युती करावी आणि यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून यासाठी मी संजय राऊत यांच्या सोबत बोलणार असल्याच रामदास आठवले यांनी सांगितलंय.

दुसरीकडे राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयावरून राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतः दारू न पिणारे उद्धव ठाकरे जनतेला वाईन का पाजताहेत असा खोचक टोला आठवले यांनी लगावला आहे.