अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; भाजप युवा मोर्चाची मागणी

पुणे – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीवर केलेला जातीयवादाचा आरोप किती अचूक आहे याचा नुकताच प्रत्यय सांगलीच्या सभेत आला आहे. या सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांची चांगलीच नौटंकी पाहायला मिळाली. नौटंकी तर ते नेहमीच करतात मात्र यावेळी त्यांनी सभेत बोलताना त्यांनी हिंदू परंपरांची (Hindu traditions) आणि पुरोहित (Priest) वर्गाची खिल्ली उडवली आहे.

विशेष म्हणजे एका समाजाची खिल्ली उडवली जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) स्टेजवर उपस्थित होते. पुरोहित वर्ग विविध कार्यांमध्ये मंत्र उच्चारण करतो त्याची खिल्ली अमोल मिटकरींनी उडवली. हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारूनसुद्धा त्यांनी खिल्ली उडवली, त्यावेळी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले नाही.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President of NCP Jayant Patil ) यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, माझ्या व्यासपीठावर ते वक्तव्य झालं, असं म्हणत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. अमोल मिटकरींच्या विधानामध्ये बरेच विनोद होते. पोट धरून बरेच लोक हसत होते. त्यावेळी लग्नविधीदरम्यानच्या मंत्राचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. त्यांची ती मतं असतील , असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, अजूनही हा वाद संपला नसूनआता भाजप युवामोर्चाने ( BJP Youth Front ) अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याला दिले ( BJP Yuva Morcha Demand Filed FIR ) आहे. पोलिसांना दिलेल्या पत्रात भाजप युवामोर्चाने म्हटले की, सांगलीतील इस्लामपूर येथील सभेत बोलताना अमोल मिटकरींनी ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मात कन्यादान या पवित्र विधीचा अपमान केला आहे. या विधानामुळे तमाम हिंदू धर्मातील बांधवांच्या व ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावना अमोल मिटकरींनी दुखावल्या असून, सामाजिक ऐक्यात तेढ निर्माण केला आहे. ब्राह्मण समाजातील मोठा घटक हा पौरोहित्यवर आपली ऊपजिविका चालवतो. अमोल मिटकरी यांनी हे विधान मुद्दाम केले असून, ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

अमोल मिटकरींनी सामाजिक तेढ निर्माण होईल, असे मुद्दामून भाषण केले. तसेच, ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणाऱ्या सर्व बांधवांची खिल्ली उडवत तमाम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात करावा. गुन्हा दाखल केला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशाराही भाजप युवामोर्चाच्या वतीने देण्यात आला.