सीमावर्ती भागातील जनतेचा स्वाभिमान गहाण पडला आहे का?

शंभूराजे फरतडे – करमाळा:  कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावरुन सुरु असलेला गदारोळ पहाता  सीमावर्ती भागातील मराठी माणसांचे कर्नाटकात सामील होण्याचे वक्तव्य ऐकून मन व्यथित होत आहे. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांचे महाराष्ट्र प्रेम संपले आहे का? या नमकहराम लोकांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे का ? यांचा मराठी बाणा कुठंतरी लुप्त होत आहे का असे प्रश्न मनात सलत आहेत.

बेळागाव भागातील मराठी बांधव महाराष्ट्राच्या निर्मिती पासुन महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहे.या साठी अनेकांनी बलिदान दिले. अनेक माता भगिनींचे कुंकु हिरावले गेले. आजही ही मराठी मंडळी या कानडी माणसांकडून होणारे अत्याचार सहन करुन महाराष्ट्र अभिमान मिरवत आहेत .  बेळागावातील छत्रपती शिवरायांचा  पुतळा हटवल्याचे प्रकरण असो किंवा सीमावादाचा प्रश्न असो या भागातील मराठी भाषिक जीवावर उदार होऊन कनडिगांच्या विरोधात लढत आहे. त्यांच्या नाकावर टिच्चुन जय महाराष्ट्र चा गजर करत आहे. आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील काही फुटकळ लोकं  कानडी फडकं हातात घेऊन कर्नाटकात जाण्याच्या मागण्या करत आहेत, हा बेळागाव सह संयुक्त महाराष्ट्र साठी बलिदान दिलेल्या शहिदांचा घोर अपमान आहे.

1969 साली “या पुढे  सीमाबांधवांना काळा दिवस पाळावा लागणार नाही” असे शिवसेनाप्रमुखांनी बेळागाव येथील मराठी भाषिकांना आश्‍वस्त करत सीमा प्रश्‍न तातडीने सोडवा अन्यथा केंद्रीय मंत्रयांना मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा  दिला होता. 8 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबईत उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांना शिवसेनेतर्फे निवेदन दिले जाणार होते. मात्र शिवसेनेला त्यावेळी परवानगी नाकारण्यात आली. यावेळी मोरारजी देसाई यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता ताफ्यातील वाहने न थांबता शिवसैनिकांना चिरडत पुढे गेली. यावैळी 67 शिवसैनिक हुतात्मा झाले आणि त्यानंतर सीमा लढा आणखी तीव्र झाला. नंतर आठ दिवस मुंबईत हिंसाचार झाला शिवसेनाप्रमुखांना अटक झाली. सीमावाद सोडवण्यासाठी शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे व तमाम शिवसैनिक कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठाम राहिले मात्र आज बाळासाहेबांच्या नावाचा वापर करुन सत्तेत आलेल्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव लावण्याचा अधिकार आहे का ? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण आज बाळासाहेब असते तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना त्याच भाषेत उत्तर दिले असते .जि गावे कर्नाटकात जाण्याचा ठराव करत आहेत त्या सरपंच ग्रामसेवक यांना हिसका दाखवला असता.

मान्य करु की सीमावर्ती भागातील नागरींकाच्या काही अडचणी असतील रस्ते, पाणी आरोग्य, शिक्षण यांचे प्रश्न देखील असतील या बाबत दुमत नाही मात्र याचा अर्थ कर्नाटकातील गावांतुन सोन्याचा धूर निघत आहे,त्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, पाणी रस्ते यांचा एकही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. कानडीगांच्या घरात लक्ष्मी चवर्या ढाळत आहे अशी तर परस्थीती नाही. भ्रष्टाचार, गुंडगिरी, रस्ते अपघात ,गुन्हेगारी, बेकारी या सर्व समस्या कर्नाटकात देखील आहेत व या वारवंवार वृत्तपत्रातुन, टिव्ही मिडीयावर आपण पहात व वाचत असतो. मग आत्ताच अचानक या लोकांना कर्नाटक चा पुळका आला आहे हे आश्चर्य वाटत आहे. या भागातील समस्यांवर राजकारण्यांनी राजकारण जरूर करावे परंतु ज्यांनी या बेळागाव व संयुक्त महाराष्ट्रा साठी आपले बलिदान केले ते व्यर्थ जाणार नाही याची जाणीव मनात ठेवणे गरजेचे आहे.कारण मराठा  साम्राज्याची सीमा कर्नाटका पर्यंत पोहोचवणाऱ्या छत्रपती शिवरायां पासुन ते संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या प्रत्येकांच्या शौर्याचा अपमान आहे.

पंढरपूर येथील काॅरीडोअर प्रश्नावरून पंढरपूर येथील कृती समितीने कर्नाटकात सामील होवु असा इशारा देऊन  पंढरपूर च्या आषाढी महापुजेला कर्नाटक च्या मुख्यमंत्र्याला बोलावण्याची भाषा केली हे अंत्यत संतापजक आहे ,पण यावरून सरकार व विरोधी पक्ष फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.  ज्या महाराष्ट्राने आज पर्यंत सर्व सुखसुविधा पुरवल्या विकास केला, ते विसरून हि कृतघ्न मंडळी काहीतरी मुद्दा समोर आणून महाराष्ट्र धर्माला कंलक लावण्याचे काम मुठभर लोक करत आहेत हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात राहुन, महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांना विकासचे पॅकेजेस देण्या ऐवजी ढुंगणावर लाथा घालून कर्नाटकात हाकलले पाहिजे, महाराष्ट्रात कर्नाटकाचे फडकं फडकणार्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करुन महाराष्ट्र धर्माचं पाणी दाखवलं पाहिजे.

आज कान्नडीगांनी महाराष्ट्रातील ट्रक चालकांसोबत हुज्जत घालून छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेल्या गाड्यांची तोडफोड केली  सीमावाद वरुन महाराष्ट्राला चोहोबाजूंनी घेरले जात असताना दिल्ली पुढे महाराष्ट्र कमजोर होत असताना  स्वताला बाळासाहेबांचे वाघ समजणारे आज दिल्ली पुढे मांजर होवुन शेपूट हालवत आहेत.  सत्तेचे लोणी खाण्यात दंग झालेल्या चाळीस बोक्यांना महाराष्ट्रातील मराठी माणसांना कर्नाटकात मारले जात त्यांचा आक्रोश यांना ऐकु येत नाही हे दुर्दैव आहे.