जगासमोर संघर्षाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित करणाऱ्या लाखो मराठा बंधू – भगिनींचे अभिनंदन  – महाजन 

 Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेतले आहे.रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार प्रामाणिक व सकारात्मक आहे ही बाब अगदी सुरुवातीपासून आम्ही सातत्याने अधोरेखित केली. समाजाच्या सर्व मागण्या मान्य होऊन त्यासंबंधी आज अध्यादेशही काढण्यात आला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.

मराठा समाजाचे शांततापूर्वक नेतृत्व करणारे श्री. मनोज जरांगे पाटील व जगासमोर संघर्षाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित करणाऱ्या लाखो मराठा बंधू – भगिनिंचे मनःपूर्वक अभिनंदन ! असे म्हणत त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके

कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर

अजित पवार यांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे; खडसेंनी थेट अजितदादांना फटकारले