चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या ऑडिओ क्लिपने खळबळ; राजकीय भूकंपाची शक्यता 

Aurangabad News: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा मुलगा ऋषिकेश खैरे हे  एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. खैरे यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून खैरे यांचा मुलगा ऋषिकेश यांनी दोन लाख रुपये घेतल्याच या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचे काम झाले नसल्याने, सदरील व्यक्ती पैसे परत मागत असल्याचे या ऑडीओ क्लिपमधील संभाषणत समोर येत आहे.

दरम्यान, पैसे देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून ऋषी खैरे टाळाटाळ करत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये समोर येत आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना हा व्यवहार झाल्याचा देखील या ऑडिओ क्लिप मधून समोर येत आहे. विशेष म्हणजे तसं ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.