‘मविआ’ची 12 आमदारांची यादी अखेर रद्द; राज्यपालांचा महाविकास आघाडीला दणका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या पत्राची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी घेतली आहे. यानुसार अखेर महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे.

राजभवनातून शनिवारी संध्याकाळी ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविण्यात आली आहे. काल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली 12 आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवले होते.

शिंदे सरकारकडून आता नवीन 12 नावांची शिफारस करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 12 आमदारांच्या रिक्त जागा भरण्यावर शिंदे सरकारचा भर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या 12 नावांमध्ये भाजपला 8 आणि शिंदे यांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.मुंबई तकने याबाबत वृत्त दिले आहे.