Govt scheme: संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणाकरीता दरमहा विद्यावेतन देण्यात येतंय

संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण

योजनेचे स्वरुप(Format of the  scheme)

राज्यातील अनुसूचित जातीच्या १८० उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणाकरीता ६ खाजगी प्रशिक्षण संस्थेत तयारी करण्यासाठी दरमहा विद्यावेतन देण्यात येते.

योजनेच्यार लाभासाठी पात्रता-

• उमेदवार अनुसूचित जातीचा असावा
• महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
• कोणत्याही विषयात पदवीधारक असावा
• वय २१ ते ३७ वर्ष असावे
• संघ लोक सेवा आयोग परीक्षेच्या निकषांप्रमाणे पात्र.

निवड पद्धती:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी) पुणे द्वारे आयोजित प्रवेश चाळणी परीक्षेमधून उमेदवारांची निवड.

योजनेअंतर्गत लाभ:

• प्रति उमेदवार प्रति माह ९ हजार रुपये विद्यावेतन.
• खासगी शिकवणी केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रति उमेदवारास रक्कम १ लाख ३५ हजार रुपये देण्यात येते.

संपर्क: डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, २८ राणीचा बाग, नवीन व्हीव्हीआयपी विश्रामगृहाजवळ, पुणे- ०१