‘निष्ठा यात्रा काढण्यापेक्षा आत्मपरिक्षण यात्रा काढली असती तर जास्त योग्य झालं असतं’

मुंबई – शिवसेना पक्षात मोठे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तब्बल ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला. या मोठ्या बंडानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पाडले आहेत. याच दुफळीमुळे शिवसेना (Shiv Sena) संपणार असा दावा विरोधकांकडून केला जातोय.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray) यांनी पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. ते निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही जाणार आहेत.

दरम्यान, मनसेचे नेते योगेश खैरे (MNS leader Yogesh Khaire) यांनी आता या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, हिंदुत्वापासून लांब गेले, आम्हाला भेटत नाही, आम्हाला निधी नाही, आमच्या आजारपणात साधा फोन नाही, राज्यात दौरे नाही अशी अनेक कारणं आमदारांनी बंड करताना दिली आहेत ! आणि आता हे ‘निष्ठा यात्रा’ काढत आहेत म्हणे….. त्यापेक्षा ‘आत्मपरिक्षण यात्रा’ काढली असती तर जास्त योग्य झालं असतं. असं त्यांनी म्हटले आहे.