Govt scheem : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना नेमकी काय आहे ? 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना(Govt scheme: What exactly is the post matric scholarship scheme for disabled students?) 

योजनेचे स्वरूप:
■केंद्रशासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागामार्फत अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
■योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण संचालनालयामार्फत
■दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
■शिष्यवृत्ती ११ वी, १२ वी, पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर पदवी, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी.

योजनेच्या अटी:
■अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
■दिव्यांगत्व टक्केवारी ४० टक्के व त्यापुढील असावी.
■मागील वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा.
■अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा, विद्यावेतनाचा (स्टायपेंड) लाभार्थी नसावा.
■अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारापेक्षा जास्त नसावे.
■एका कुटूंबातील फक्त २ दिव्यांग अपत्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल.
■विद्यार्थ्यांने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतःचे खाते उघडणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे:
■मागील वर्षाची गुणपत्रिकेची प्रत.
■सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
■सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले रहिवास प्रमाणपत्र.
■महाविद्यालयास चालू वर्षाचे शिक्षण शुल्क भरल्याची पावती
■विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
■महाविद्यालयाचे बोनाफाइड प्रमाणपत्र.

लाभाचे स्वरूप
■परीरक्षण भत्ता
■दिव्यांग भत्ता
■संस्थाकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे ना-परतावा शुल्क
■पुस्तक भत्ता
■विकलांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांचेमार्फत विद्यार्थ्यांचे थेट बँक खातेवर रक्कम जमा करण्यात येते.

अर्जाची पद्धत:
■ नवीन मंजूरीसाठी तसेच नूतनीकरणासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक.

संपर्क- शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे www.dhepune.gov.in