Navneet Rana | नवनीत राणांचा लोकसभेचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देत जात प्रमाणपत्र ठरवले वैध

Navneet Rana | भाजपाने अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित होते. त्याचा निकाल लागलेला नसतानाही भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्याने विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल देताना नवनीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.

नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला होता. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालामध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत