Hardik Pandya | शतक आणि अर्धशतक म्हणजे वेळ वाया घालवणे…, हार्दिक पंड्या नेमकं काय म्हणाला?

वर्ल्ड कप 2023 मध्ये दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयपीएल 2024 मध्ये त्याच्या जुन्या टीमसोबत दिसणार आहे. गेल्या 4 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला हार्दिक पांड्या अलीकडेच डीवाय पाटील टी20 चषक स्पर्धेत मैदानात परतण्यात यशस्वी ठरला, जिथे हार्दिकने चेंडूसह चमकदार कामगिरी केली. हार्दिकने पहिल्याच सामन्यात 2 बळी घेत पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?
दरम्यान, स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात हार्दिकने (Hardik Pandya) त्याच्या कामगिरीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. स्टार स्पोर्ट्सवरील एका शोमध्ये मुंबई इंडियन्ससोबत लोकांशी थेट संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी हार्दिकला अनेक रोचक प्रश्न विचारले. दरम्यान, हार्दिकला त्याच्या आयपीएलमधील एकूण अर्धशतकांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात त्याने सांगितले की, त्याच्यासाठी शतके आणि अर्धशतके ही फक्त एक संख्या आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना हार्दिक पंड्या म्हणाला, “मी अर्धशतक किंवा शतकावर विश्वास ठेवत नाही, माझ्यासाठी आकडेवारी ही फक्त एक संख्या आहे आणि ती वेळेचा अपव्यय आहे.” यादरम्यान हार्दिकला आयपीएल मधील त्याच्या आवडत्या अर्धशतकाबद्दल विचारण्यात आले. प्रत्युत्तरात हार्दिक पांड्या म्हणाला की, जिथे आपण हरलो तिथे मला माझी खेळी आवडत नाही. एका चाहत्याने 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध हार्दिकच्या 21 चेंडूत 60 धावांच्या खेळीचा उल्लेख केला होता, पण पंड्याने तोही फेटाळून लावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

आयपीएलमध्ये 2000 हून अधिक धावा आणि 53 विकेट्स
जर आपण हार्दिक पांड्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने एकूण 123 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 30.38 च्या सरासरीने 2309 धावा केल्या आहेत आणि 145 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट आहे. याशिवाय हार्दिकच्या नावावर 53 विकेट्स आहेत. तसेच, हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्स संघाचा त्या पाच हंगामात भाग होता जेव्हा संघ रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनला होता.

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal