तुम्हीही दिवसभरातून ४-५ वेळा चहा पिताय, आताच सवय बदला! होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Tips: चहा (Tea)… हा सर्वांच्या आवडीचा असतो. सकाळी उठलं की घरात वडिलधाऱ्यांपासून लहान मुले-मुलीही चहा ब्रेडचा आस्वाद घेताना दिसतात. संध्याकाळ झाली की, बहुंताश जणांच्या घरी चहाचा वास येतो. पाहुणे आले, वडील कामावरून दमून घरी आले, कामाचा कंटाळा आला, अभ्यास करताना झोप आली अशा इत्यादी कामांवेळी लोकांचा चहा लागतो. परंतु दिवसभरात नेमका कितीवेळा चहा प्यावा, हे तुम्हाला माहितीय का? दिवसभरातून ४-५ वेळा जर तुम्ही चहा पित असाल, तर त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

या बातमीत आम्ही तुम्हाला, चहाच्या अधिक सेवनामुळे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सांगणार आहोत.

आता तुम्ही विचार करत असाल की एका दिवसात किती कप चहा प्यायला पाहिजे? चहामध्ये कॅफीन असते हे सर्वांनाच माहीत आहे, पण तुमच्या शरीरात किती कॅफिन असावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रथम, चहा फक्त आपल्या पोटासाठी समस्या निर्माण करू शकतो. तुमच्या पोटात बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की जेव्हा तुम्ही चहा पितात तेव्हा तुमची झोप उडते आणि तुम्हाला जास्त वेळ झोप येत नाही. यामुळेच चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिन तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब करून तुमची झोप खराब करण्याचे काम करतात.

याशिवाय जास्त चहाचा परिणाम तुमच्या आतड्यांनाही हानी पोहोचवू शकतो. हे ऐकायला नक्कीच विचित्र असेल, पण चहा प्यायल्याने तुमची आतडेही खराब होतात हे खरे आहे. यामुळे तुम्हाला अन्न पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच तुम्ही दिवसातून 2 वेळा चहा पिऊ शकता, जर तुम्ही यापेक्षा जास्त चहा प्यायला तर ते तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.