हिंदू महासंघातर्फे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटांच्या खास शो आयोजन

काश्मिरी हिंदू शेअर करणार त्यांचे अनुभव

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे. काश्मिरी फाईल्स सर्वांनी पाहावे असे आवाहन अनेकजण करत आहेत.

पुण्यात देखील हिंदू महासंघा तर्फे उद्या संध्याकाळी  ठीक 6 वाजता मंगला थेटर येथे द काश्मिरी फाइल्सच्या शोचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास काश्मिरी पंडित आणि पनून काश्मीर चे अध्यक्ष  राहुल कौल हे उपस्थित राहणार आहेत. पुण्यात निवास करत असलेले अनेक काश्मिरी हिंदू यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. ते त्यांचे अनुभव येथे शेअर करणार आहेत. तिरंगा आणि भगवा च्या साक्षीने आम्ही हे सर्व करणार आहोतअशी माहिती हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी दिली.