RSS : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र, हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार – मोहन भागवत

Mohan Bhagwat Speech: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस, RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत आणि हिंदू म्हणजे सर्व भारतीय आहेत असं त्यांनी म्हटले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख भागवत यांनी शुक्रवारी (1 सप्टेंबर) महाराष्ट्रातील नागपुरात ही टिप्पणी केली. ‘दैनिक तरुण भारत’ वृत्तपत्र चालविणाऱ्या श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या ‘मधुकर भवन’ या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आरएसएस प्रमुख भागवत म्हणाले, “हिंदुस्थान (भारत) हे ‘हिंदू राष्ट्र’ आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत आणि हिंदू म्हणजे सर्व भारतीय. आज जे भारतात आहेत ते सर्व हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमीचे आहेत, दुसरे काही नाही.” त्याचवेळी लोकांच्या अपेक्षांचा उल्लेख करताना संघाने सर्वांची काळजी करायला हवी, असेही ते म्हणाले.

भागवत म्हणाले, काही लोकांना ते समजले आहे, तर काहीजण त्यांच्या सवयी आणि स्वार्थामुळे समजून घेऊनही त्याची अंमलबजावणी करत नाहीत. याशिवाय, काही लोकांना ते अद्याप समजले नाही किंवा ते विसरले आहेत.