कसं होतं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचं काम? सर्वेक्षणातून आली धक्कादायक बाब समोर 

Mumbai – दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता एक सर्वेक्षण करण्यात आले असून यात  मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं काम कसं होतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या सर्वेक्षणातून जनतेनं कौल कोणाला आहे? हे समोर आलं आहे.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री(Maharashtra CM) असताना जनतेला त्यांचं काम किती आवडलं आणि किती लोकांना आवडलं नाही, हे या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम अधिक चांगलं होतं, असं महाराष्ट्रातील 21 टक्के लोकांचं मत आहे. तसेच, 27 टक्के लोकांनी ठाकरे यांचं काम समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे.

45 टक्के लोकांना उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी आवडली नाही आणि त्यांनी त्यांना वाईट म्हटलं आहे. उर्वरित सात टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे.हा ओपिनियन पोल झी न्यूज आणि मेटारिझनं केला आहे.