Semi Finalमध्ये दिसला रोहितचा रुद्रावतार, पहिल्या चेंडूपासूनच न्यूझीलंडवर आणलं दडपण

Rohit Sharma: रोहित शर्माने मोठ्या सामन्यांमध्ये फलंदाजी कशी करावी हे दाखवून दिले. पहिल्याच चेंडूपासून विरोधी संघांवर दडपण कसे आणायचे याचा नमुना आज पाहायला मिळाला. वर्ल्ड कप 2023 च्या (World Cup Semi Final) पहिल्या सेमीफायनलमध्ये बुधवारी ‘द हिटमॅन शो’ पाहायला मिळाला.

भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध झंझावाती सुरुवात केली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्माने केवळ 29 चेंडूत 47 धावा केल्या. रोहित वेगाने स्पर्धेतील चौथ्या अर्धशतकाकडे वाटचाल करत होता, पण टीम साऊदीविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना मिडऑफला केन विल्यमसनने त्याचा झेल घेतला. रोहितने ४७ पैकी ४० धावा केवळ चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर केल्या. हिटमॅनने 162.06 च्या स्ट्राईक रेटने आपल्या इनिंगसह काही मोठे रेकॉर्डही आपल्या नावावर केले.

टीम साऊदीने नवव्या षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. कर्णधार रोहित शर्माला पुढे फटका मारायचा होता, पण संथ चेंडूमुळे तो चुकला. रोहित शर्माने पहिल्याच षटकात सलग दोन चौकार मारून आपला इरादा व्यक्त केला होता. रोहितने तिसर्‍याच षटकात बोल्टच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारून किवीजच्या मनाचा थरकाप उडवला. तीन षटकांत संघाची धावसंख्या बिनबाद 25 धावांवर पोहोचली होती. न्यूझीलंड संघ वारंवार गोलंदाज बदलत होता, पण निकाल बदलत नव्हता.

यावेळी रोहित शर्माने आपल्या नावावर अनेक विक्रम केले. यात रोहित विश्वचषकाच्या एका सत्रात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू देखील तो बनला आहे.विश्वचषकात पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक धावा (३१७) करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…