हिंमत असेल तर ताजमहालला मंदिर करून दाखवा –  मेहबुबा मुफ्ती

नवी दिल्ली –  आग्रा(Aagra) येथील ताजमहालचा(Tajmahal) वाद वाढत चालला आहे. आता या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती(Jammu Kashmir ex chief minister mehbooba mufti) यांनीही उडी घेतली आहे. ‘हिंमत असेल तर ताजमहालला मंदिर करून दाखवा,’ असा इशारा त्यांनी भाजप सरकार(Bjp Government) आणि हिंदू संघटनांना(Hindu Party) दिला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारवर आरोप केला की, असे सर्व वाद केवळ लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच उभे केले जात आहेत. जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांना मुस्लिमांच्या(Muslims) मागे लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशाचा पैसा लुटून परदेशात पळून गेलेल्यांना पकडण्याऐवजी मुघलांनी(Mughals) बांधलेल्या प्रत्येक जागेला विरोध करायचा आहे.

भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखे काहीच नाही, असा टोला पीडीपी प्रमुखांनी लगावला आहे. बेरोजगारी(unemployment), महागाई(inflation) या सगळ्यात वाढ होत आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. आपला देश आता गरिबीच्या(Poverty) बाबतीत बांगलादेश(Bangladesh), पाकिस्तान(Pakistan) आणि नेपाळच्या(Nepal) मागे पडला आहे.असं त्या म्हणाल्या.