पंढरपुरात ‘स्वाभिमानी’ने दिला महावितरणच्या अधिकाऱ्याला दिला साप भेट

पंढरपुर –  महावितरणने शेतीसाठी दिवसा वीज द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन राज्यभर आंदोलन सुरू आहेत. ‘स्वाभिमानी’चे नेते राजु शेट्टी हे स्वतः कोल्हापूर येथिल महावितरण कार्यालयासमोर गेल्या आठवडाभरापासून धरणे आंदोलन करत आहेत.

स्वाभिमानी कडुन महावितरण व सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाची धग राज्यभरात वाढताना दिसत आहे, राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना सोबत घेत आंदोलन करत आहेत. काही ठिकाणी जाळपोळ व तोडफोड सारख्या घटना देखील घडल्या आहेत.

काल पंढरपूर येथे देखील महावितरण विरोधात स्वाभिमानी कडुन धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस निवेदन स्वीकारण्यात कार्यकारी अभियंता गवळी हे आले असता स्वाभिमानी च्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित शेतकरी  सचिन ताठे यांनी त्यांना रात्रपाळीत पिकाला पाणी देताना साप आढळला असता तोच साप  ताठे हे तोच साप घेवुन आंदोलनास आले व तो साप कार्यकारी अभियंता यांना भेट दिला. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी हा साप म्हणजे महावितरण कडुन शेतकऱ्यांना मिळालेली देण आहे, महावितरणने आजवर शेतकऱ्यांसोबत कायमच दुजाभाव केला आहे,रात्री अपरात्री कायम शेतकऱ्यांना वन्यप्राणी व हिंस्र प्राणी यांचा त्रास होतो ही महावितरणला जाणिव व्हावी म्हणून आम्ही प्रतीकात्मक पध्दतीने हा साप महावितरण ला भेट दिला आहे, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

स्वाभिमानी कडुन केलेल्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. लवकरात लवकर दिवसा वीज देण्याचा निर्णय न घेतल्यास यातुन प्रखर आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी उपस्थित आंदोलकांनी केला.

यावेळी स्वाभिमानीचे सोलापुर जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील,जिल्हासंघटक शाहजहान शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव नागणे, नानासाहेब चव्हाण,बाहुबली सावळे,मनोज गावंधरे,नवनाथ मोहिते,सुशिल शिंदे यांसह पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.