आयपीएल लिलावात ३० खेळाडूंचे चमकले नशीब, ‘या’ २ क्रिकेटर ठरल्या सर्वात महागड्या; पाहा यादी

WPL Auction 2024: महिला प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्रातील खेळाडूंचा लिलाव शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत पार पडला. लिलावासाठी निवडलेल्या 165 खेळाडूंपैकी 30 भाग्यवान ठरले. पाच संघांमध्ये एकूण 30 जागा रिक्त होत्या. गुजरात जायंट्सने त्यांच्या संघात जास्तीत जास्त 10 खेळाडूंचा समावेश केला होता. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने किमान तीन खेळाडूंवर बोली लावली. येथे आम्ही तुम्हाला लिलावानंतर सर्व संघांच्या संयोजनाबद्दल सांगत आहोत…

मुंबई इंडियन्स
गेल्या मोसमात चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने पाच खेळाडूंना खरेदी केले. दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईलसाठी त्यांनी सर्वाधिक 40 लाख रुपये खर्च केले. क्रिथना बालकृष्णन, फातिमा जाफर, अमनदीप कौर आणि एस सजना यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांना विकत घेतले. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. फ्रँचायझीने लिलावात इस्माईलच्या रूपाने अनुभवी खेळाडूला खरेदी केले. त्याचवेळी चार तरुणांना खरेदी करून बॅकअप तयार करण्यात आला.

दिल्ली कॅपिटल्स
ऑस्ट्रेलियन दिग्गज मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सकडे लिलावात फक्त तीन खेळाडू विकत घेण्यासाठी जागा होती. त्यांनी तिन्ही जागा भरून काढल्या. दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीच्या फेरीतच ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅनाबेल सदरलँडला विकत घेतले. फ्रँचायझीने सदरलँडसाठी तिजोरी उघडली आणि तिला 2 कोटी रुपयांना विकत घेतले. सदरलँड ही या लिलावात संयुक्तपणे सर्वात महागडा खेळाडू ठरली. दिल्लीने अश्विनी कुमारी आणि अपर्णा मंडल यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांना विकत घेतले.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी गेल्या मोसमात काही खास नव्हती. संघाला यावेळी शानदार पुनरागमन करायचे आहे. त्यांनी लिलावात सात खेळाडू खरेदी केले. आरसीबीने भारतीय गोलंदाज एकता बिश्तला सर्वाधिक 60 लाख रुपयांना खरेदी केले. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू जॉर्जिया बेरहॅमसाठी त्याने 40 लाख रुपये खर्च केले. त्यांनी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू सोफी मोलिन्यु, भारतीय गोलंदाज सिमरन बहादूर, अष्टपैलू एस मेघना आणि इंग्लंडची गोलंदाज केट क्रॉस यांना प्रत्येकी 30 लाख रुपयांना खरेदी केले. शुभा सतीशसाठी 10 लाख रुपये खर्च केले.

यूपी वॉरियर्स
यूपी वॉरियर्स संघाने पाच खेळाडूंना खरेदी केले. अ‍ॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील या संघाने गेल्या वर्षीच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. यूपी वॉरियर्सने लिलावात सर्वाधिक पैसे वृंदा दिनेशसाठी खर्च केले. फलंदाज वृंदाला संघाने 1.30 कोटी रुपयांना विकत घेतले. यूपीने इंग्लंडच्या डॅनियल व्याट आणि भारताच्या गौहर सुलतानासाठी प्रत्येकी 30 लाख रुपये खर्च केले. सायमा ठाकूर आणि पूनम खेमनार यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांना विकत घेतले.

गुजरात जाएंट्स
लिलावात कोणत्याही संघाकडे सर्वाधिक जागा रिक्त असतील तर ते गुजरात जायंट्स होते. त्यांनी सर्व 10 रिक्त जागा भरल्या. भारताची युवा अष्टपैलू खेळाडू काशवी गौतमसाठी गुजरातने सर्वाधिक 2 कोटी रुपये खर्च केले. काशवी संयुक्तपणे सर्वात महागडी खेळाडू ठरली. गुजरातने ऑस्ट्रेलियन फलंदाज फोबी लिचफिल्डला एक कोटी रुपयांना विकत घेतले. त्यांनी भारताच्या वेदा कृष्णमूर्ती, मेघना सिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या लॉरेन चीटलला प्रत्येकी 30 लाख रुपयांना विकत घेतले. त्रिशा पूजिता, कॅथरीन ब्राइस, मन्नत कश्यप आणि तरन्नुम पठाण यांना संघाने प्रत्येकी 10 लाख रुपयांना विकत घेतले.

महत्वाच्या बातम्या-

इंदापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Rajeshwari Kharat And Somnath Awghade : अखेर ‘जब्या’ला काळी चिमणी घावली! ‘शालू’सोबत जुळले प्रेमाचे धागे?

भाजप आमदार IASसोबत बांधणार लगीनगाठ; ३ राज्यांत रिसेप्शन, ३ लाख जणांना आमंत्रण