‘… म्हणून मी अजूनही द कश्मीर फाइल्स नाही पाहिला ‘

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नुकतीच गायक सोनू निगमनं (Sonu Nigam) एका मुलाखतीमध्ये त्यानं हा चित्रपट न पाहिल्याच कारणं सांगितलं. मुलाखतीमध्ये सोनूला विचारण्यात आलं की, ‘त्याने हा चित्रपट अजून का पाहिला नाही?’ तेव्हा या प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं, ‘माझ्यामध्ये हा चित्रपट पाहण्याची हिंमत नाही कारण मी संवेदनशील आहे.  माझ्या संवेदना केवळ काश्मिरी पंडितांबद्दलच नाही तर त्या सर्व समुदायांबद्दल आहे ज्यांनी त्रास सहन केला आहे.’

पुढे सोनू म्हणाला, ‘हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा मी दुबईमध्ये (Dubai) होतो. हा चित्रपट दुबईमध्ये रिलीज झाला नाही. पण भारतात परत आल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची हिंमत झाली नाही.’