‘बाबा एका महिन्याने हसेल’, रोहित शर्माच्या लेकीचा Cute Video होतोय व्हायरल

Rohit Sharma Daughter Samaira: भारताने आयोजित केलेला एकदिवसीय विश्वचषक संपून पाच दिवस उलटले आहेत. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे दु:ख भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही कायम आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने सलग 10 सामने जिंकले, मात्र अंतिम फेरीत भारताला 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवाने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला असतानाच संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही धक्का बसला. सामन्यानंतर तो भावूकही होताना दिसला. अशा परिस्थितीत रोहित शर्माची मुलगी (Rohit Sharma Daughter) समायरा (Samaira Sharma) हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रोहितचे दु:ख सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
व्हिडिओमध्ये समायरा म्हणते, “बाबा त्याच्या खोलीत आहे, तो जवळजवळ पॉझिटिव्ह आहे आणि महिन्याभरात तो पुन्हा हसेल” असे म्हणताना दिसत आहे. समायराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही. सध्या सोशल मीडियावर याला खूप पसंती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे