संतापजनक! कर्नाटकातील शाळेत ब्राम्हण मुलीला अंडे खायची जबरदस्ती, मुलीला मानसिक धक्का

Brahmin girl forced to eat egg at govt school in Karnataka: ब्राह्मण समाजातील एका विद्यार्थिनीने सरकारी शाळेतील शिक्षकाने अंडी खाण्यासाठी जबरदस्ती केल्याची तक्रार केली आहे. तिचे वडील व्ही श्रीकांत, जे एक सरकारी शाळेत शिक्षक आहेत, यांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. मुलगी शिवमोग्गा येथील गार्टिकेरेजवळील कम्माची गावातील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 2 मध्ये शिकते.

सात वर्षांच्या मुलीने तिच्या वडिलांकडे तक्रार केली की तिच्या शिक्षकांनी तिला सांगितले होते की अंडी चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून अंडी दिली जातात. परंतु मुलगी शुद्ध शाकाहारी असून तिने कधीही अंडी खाल्ली नव्हती. तिच्या नकारानंतरही शिक्षकाने तिला जबरदस्तीने अंडे खायला लावला.

मुलीचे वडील श्रीकांत यांनी शिवमोग्गा डीडीपीआय सीआर परमेश्वरप्पा यांच्याकडे तक्रार केली, त्यांनी सांगितले की त्यांनी बीईओला चौकशी करण्यास सांगितले आहे. श्रीकांत यांनी TOI ला सांगितले की त्यांच्या मुलीने कधीही मांसाहार केला नाही पण दोन दिवसांपूर्वी तिला अंडी खाण्यास भाग पाडले गेले. त्यांनी शाळेचे सहायक शिक्षक पुट्टास्वामी यांनी हा प्रकार केला असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

DDPI ला लिहिलेल्या पत्रात श्रीकांत यांनी सांगितले की, “KPS मध्ये इयत्ता दुसरीत 26 विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी 10 शाकाहारी आहेत. त्यांनी शाळेच्या अधिकाऱ्यांना कळवले होते की त्यांची मुलगी शाकाहारी आहे आणि त्यांनी तिला अंड्यांऐवजी चिक्की देण्यास सांगितले होते. पण पुट्टास्वामी यांनी वर्गाला सांगितले की अंडी आरोग्यासाठी चांगली असतात आणि माझ्या मुलीला अंडी खाण्यास भाग पाडले. यामुळे माझी मुलगी आजारी पडली आणि ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे,”  असे श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे