IND vs AUS: ‘प्लेअर ऑफ द मॅच’ झाल्यानंतर यशस्वीने स्वीकारली चूक, जाणून घ्या का म्हणाला ऋतुराजला सॉरी

India vs Australia 2nd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 सामना तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला आणि या सामन्यात देखील भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फक्त नाणेफेक जिंकली, बाकी काही नाही. भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण देण्यात आले आणि भारताने टी-२० फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने 20 षटकात 4 गडी गमावून 235 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाला केवळ 191 धावा करता आल्या आणि सामना 44 धावांनी गमावला.

या सामन्यातील यशस्वी जयस्वालला (Yashaswi jaiswal) या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, ज्याने अवघ्या 25 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. याशिवाय क्षेत्ररक्षणातही त्याने दोन झेल घेतले आणि एक झेल खूप जबरदस्त होता. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर यशस्वीने पहिल्या टी-20 सामन्यात झालेली चूक मान्य केली आणि त्या चुकीनंतर रुतुराज गायकवाडची तत्काळ माफी मागितल्याचे सांगितले.

विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात यशस्वी जैस्वालने एक शॉट खेळला आणि दोन धावा झटपट धावल्या. पहिली रन पूर्ण केल्यानंतर त्याने आत्मविश्वासाने रुतुराजला दुसऱ्या रनसाठी बोलावले आणि जवळपास हाफवे पॉइंट गाठला. रुतुराजनेही त्याच्या हाकेवर विश्वास ठेवला आणि अर्धी खेळपट्टी आली, पण त्यानंतर जयस्वालला वाटले की आपण धावा पूर्ण करू शकणार नाही, म्हणून तो माघारी फिरला, आणि स्ट्रायकरच्या शेवटी रुतुराजला माघारी येण्याची संधीच उरली नाही आणि तो धावबाद झाला आणि एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये परतला.

दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यावर यशस्वी म्हणाला, मी अजूनही शिकत आहे. मागच्या सामन्यात ही माझी चूक होती आणि मी रुतुराजला सॉरी म्हणालो. मी माझी चूक मान्य केली. रुतु भाऊ छान आणि दयाळू व्यक्ती आहेत त्याने मला माफ देखील केले. पुढे तो म्हणाला, सध्या मी माझ्या फिटनेसवर खूप काम केले आहे. मी माझे शॉट्स विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या मानसिक स्थितीवरही काम करत आहे आणि माझ्या सराव सत्रांवर विश्वास ठेवतो.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

राज्यभरात एकत्र या, बैठका घ्या; सभा घ्या ओबीसींचा आवाज बुलंद करा – मंत्री छगन भुजबळ