पाकिस्तानात हाहाकार; पेट्रोल 35 रुपयांनी महाग, दर 250 रुपयांवर

सध्या पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. जिथे पाकिस्तानातून पिठाचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत होत्या, तिथे आता केंद्रीय अर्थमंत्री इशाक दार यांनी रविवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३५ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार दार यांनी सकाळी 10.50 वाजता सुरू झालेल्या संबोधनात ही घोषणा केली आहे.

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पेट्रोल २४९.८० रुपये प्रति लिटर झाले आहे. तर

हायस्पीड डिझेल 262.80 रुपये प्रति लिटर, रॉकेल 189.83 रुपये प्रति लिटर, लाईट डिझेल तेल 187 रुपये प्रति लिटर आहे. पाकिस्तानी बातम्यांनुसार, अर्थमंत्री इशाक दार यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन झाले आहे आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत 11 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्री म्हणाले की, ऑक्टोबर ते जानेवारी 29 या चार महिन्यांत पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय किमती आणि रुपयामध्ये घसरण होत असतानाही पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार आम्ही या चार उत्पादनांच्या किमान किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 35 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. केरोसीन तेल आणि लाईट डिझेलच्या दरात प्रत्येकी 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.नवीन किमतींच्या घोषणेमुळे पेट्रोलचा पुरवठा बंद झाल्याच्या अफवा दूर होतील, अशी आशा मंत्र्यांनी व्यक्त केली.