मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

कोल्हापूर –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम देत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिंदे गट आणि मनसे या तीन पक्षात युती होणार का? याबाबत विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “भाजपा किंवा शिंदे गटाशी मनसेची युती होणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. यापूर्वीही मी हे जाहीर केलं आहे.”