टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने पंतप्रधान मोदी झाले खूश, म्हणाले…

IND vs NZ Semi Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वनडे विश्वचषक २०२३चा पहला उपांत्य सामना पार पडला. या चित्तथरारक सामन्यात यजमानांनी ७० धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी हे सामना विजयाचे शिल्पकार राहिले.

भारताने न्यूझीलंडला हरवून विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेससह अनेकांनी या मोठ्या विजयावर आनंद व्यक्त केला. या विजयाबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने चमकदार कामगिरी केली आणि शानदार शैलीत फायनलमध्ये प्रवेश केला. उत्कृष्ट फलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीने आमच्या संघाला सामना जिंकून दिला. अंतिम फेरीसाठी शुभेच्छा!

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…