महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या देत धमकावले? संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची एक कथित ऑडिओ क्लिप (An audio clip of Sanjay Raut) समोर आली आहे. या टेपमधील आवाज शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि नेते संजय राऊत यांची ही क्लिप असल्याचा आरोप एक महिला करत आहे. या टेपमध्ये ७० सेकंदात २५ पेक्षा जास्त शिव्या ऐकू येत आहेत.

दरम्यान,  या प्रकरणात संबंधित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून काहीजण मला त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत. या प्रकरणात वारंवार पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न पण तक्रार घेतली जात नव्हती. अखेर १६ जुलै २०२२ रोजी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असे महिलेने सांगितले.

पत्रा चाळ जमीन प्रकरणातील साक्षीदार असलेल्या या महिलेने गेल्या आठवड्यात मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं की, ईडीसमोर जबाब दिल्यास आपल्याला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे.