नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आलं; तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेत होती

India economy | संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातल्या देशाच्या दुर्बल आर्थिक स्थितीबाबत केंद्र सरकारनं काल संसदेच्या दोन्ही सभागृहात श्वेतपत्रिका सादर केली. अर्थमंत्री निर्मला सीतरामन (Nirmala Sitharaman) यांनी ही श्वेतपत्रिका मांडली. 59 पानांच्या या श्वेतपत्रिकेत युपीए सरकारच्या काळातील 15 आर्थिक गैरव्यवाहरांचा उल्लेख आहे.

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आलं; तेव्हा देशाची अर्थव्यवस्था (India economy) अत्यंत बिकट अवस्थेत होती; बँकांच्या थकीत कर्जात वाढ झाली होती; रूपयाच्या किमतीत घसरण झाली होती; तसंच सार्वजनिक उद्योगांची स्थितीही खालावलेली होती; मात्र केंद्र सरकारनं केलेलं योग्य आर्थिक व्यवस्थापन, प्रशासन तसंच योग्य धोरणांमुळे 2014 पूर्वीच्या काळातील प्रत्येक आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यात आली; देश आता शाश्वत विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसनं काल नवी दिल्लीत सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली. सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. तसंच भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांशी केंद्राकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसनं काढलेल्या या काळ्या पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत बोलताना टीका केली. देशाच्या विकासासाठी सरकार यापुढेही काम करतच राहील असं ते म्हणाले. राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना काल निरोप देण्यात आला; यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाला आणि संसदेच्या सभागृहांना डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे; असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ