Hardik Pandya Injury : धोनीच्या शिष्याला मिळणार हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात स्थान ?

Hardik Pandya Injury Update: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंतचे पाचही सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ रविवारी लखनौच्या एकना स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध (INDvsENG) आपला पुढचा सामना खेळणार आहे.

टीम इंडिया आपला विजयरथ अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि स्पर्धेत सलग सहावा विजय नोंदवेल. भारतीय संघाचा पुढील सामना निःसंशयपणे महत्त्वाचा आहे आणि त्याआधी स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत (Hardik Pandya Fitness) एक मोठे अपडेट मिळाले आहे. हार्दिक पांड्याला इंग्लंडविरुद्धचा सामना खेळणे अशक्य असल्याचे जाणून चाहत्यांची निराशा होईल.

हार्दिक पांड्या सध्या बेंगळुरूमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाची घाई करू इच्छित नाही आणि म्हणूनच त्याला पूर्णपणे सावरण्यासाठी वेळ देत आहे. दरम्यान, कप्तान रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड हार्दिक पंड्याच्या रिप्लेसमेंटबद्दल विचार करू शकतात आणि ते युवा ऑलराउंडर खेळाडू शिवम दुबे याला रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये सामील करू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=Tt-1tSruXa0&t=10s

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ