James Anderson | टेस्ट क्रिकेटमध्ये जेम्स अंडरसनच्या 700 विकेट्स, बनला जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज

James Anderson completes 700 test wickets: इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. भारत विरुद्ध धर्मशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अँडरसनने कुलदीप यादवला बाद करून ही कामगिरी केली.

तसे पाहता, जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 700 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने 800 कसोटी बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नने 708 कसोटी बळी घेतले.

100-700 विकेट घेणारे वेगवान गोलंदाज
100 विकेट्स – चार्ली टर्नर ऑस्ट्रेलिया, 1895
200 विकेट्स – ॲलेक बेडसर, इंग्लंड, 1953
300 विकेट्स – फ्रेड ट्रुमन, इंग्लंड, 1964
400 विकेट्स – रिचर्ड हॅडली, न्यूझीलंड, 1990
500 विकेट्स – कोर्टनी वॉल्श, वेस्ट इंडिज 2001
600 विकेट्स – जेम्स अँडरसन, इंग्लंड, 2020
700 विकेट्स – जेम्स अँडरसन, इंग्लंड, 2024*

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर