‘कच्चा बदाम’ फेम गायिकाचा अपघात, जाणून घ्या आता कशी आहे प्रकृती

बीरभूम :  पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये कच्चा बदाम फेम गायक भुबन बड्याकर यांचा अपघात झाला असून त्यात ते जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भुवनच्या छातीला दुखापत झाली आहे.भुबन कार चालवायला शिकत होताभुवन यांचा अपघात सोमवारी झाला. भुबनने नुकतीच कार खरेदी केली आहे . भुबन कार चालवायला शिकत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर कच्चा बदाम फेम गायकाला सुपर स्पेशालिटीमध्ये दाखल करण्यात आले.

भुवनने नुकतेच एका म्युझिक कंपनीसाठी कच्चा बदाम या गाण्याचा व्हिडिओ शूट केला आहे. त्याला अनेक कंपन्यांच्या आणि टीव्ही शोच्या ऑफर्स येत आहेत. त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.