शिंदे साब बढीया काम कर रहे है; कालीचरण महाराजांनी केले मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक 

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात नवी सरकार उदयास आले आहे. हिंदुत्वाचा (Hinduism) आवाज बुलंद करणारे हे सरकार असल्याचा दावा भाजप आणि शिंदे समर्थक करत आहेत. दुसऱ्या बाजूला विरोधक त्यांच्यावर काहीतरी खुसपट काढून टीका करताना दिसत आहेत. एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित असलेल्या कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) आज राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.

पुण्यातील शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टकडून आयोजित म्हसोबा उत्सवाच्या दीप अमावस्येनिमित्त कार्यक्रमात कालीचरण महाराज उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला आमचा पाठिंबा आहे. शिंदे साब बढीया काम कर रहे है. त्यांनी दोन शहरांचं नामांतर केलं.

शिंदे सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) तर उस्मानाबादचं नाव धाराशिव (Dharashiva) करण्याचा निर्णय घेतला आहे, असं कालीचरण महाजार म्हणाले. दरम्यान हिंदूंच्या अस्मितेचा विजय होईल, अशा राजांनी निरंतर सत्तेत बसावं . एकनाथ शिंदे यांना हार्दिक शुभेच्छा. मला आनंद आहे की शिंदे सरकार आलं. हिंदुत्ववादी लोकांनीच सत्तेत बसावं हा आमचा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे.