Shrikant Shinde | कल्याणची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर फडणवीसांकडून जाहीर, श्रीकांत शिंदेंना महायुतीचं तिकीट

Shrikant Shinde | राज्यातील कल्याण-डोबिंवली मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. महायुतीतून कोणत्या पक्षाला ही जागा दिली जाईल, याची उत्सुकता सर्वांना होती. आता या बहुप्रतिक्षित मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कल्याण-डोंबिवलीचा उमेदवार जाहीर केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील, भाजपचा पाठिंबा असेल, मोठ्या मतांनी निवडून आणू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. श्रीकांत शिंदे यांनी आधीच प्रचाराचा नारळ फोडला होता.

कल्याणमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा दरेकर आहेत. २ दिवसांआधीच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये दरेकर विरोधात शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार