Kangana Ranaut | पंतप्रधान मोदी चमकता सूर्य आहेत तर विरोधक मेणबत्ती, कंगना रणौतचे लक्षवेधी वक्तव्य

Kangana Ranaut | लोकसभा निवडणुकीसाठी ( LokSabha Election 2024) भाजपने अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कंगना चर्चेत आली आहे. काँग्रेस नेत्यांनी कंगना राणौतविरोधात जोरदार वक्तव्य केलं होतं. यावर कंगनाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने पंतप्रधान मोदींना सूर्य आणि विरोधकांना मेणबत्ती म्हटले आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर कंगना रनौत आणि मंडी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट पोस्ट करून मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. अभिनेत्री कंगना राणौत हिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एका मुलाखतीत कंगनाने सांगितले की, विरोधी पक्षातील सर्व मोठे नेते करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ते सर्व एकाच ठिकाणी जमू शकत नाहीत. त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली तर ते सूर्यासारखे चमकतील आणि विरोधक त्यांच्यासमोर मेणबत्तीही नाही.

याशिवाय कंगना रणौतने (Kangana Ranaut) आझाद हिंद फौजेचे संस्थापक आणि महान स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस यांचे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून वर्णन केले. कंगना म्हणाली, “ज्या व्यक्तीने आपले रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. जर्मनीपासून जपानपर्यंतच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याला या देशाचा पंतप्रधान का बनवण्यात आले नाही? अखेर ते कुठे गायब झाले?”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?