BJP ची करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर, सरचिटणीस पदी जितेश कटारिया तर महिला आघाडी शहराध्यक्ष पदी रेणुका राऊत

BJP : भारतीय जनता पार्टीचे (BJP) जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar), आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjit Singh Mohite Patil), माढा लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील (Rajkumar Patil), जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत (Chetan Singh Kedar Sawant), जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष जगदीश आगरवाल (Jagdish Agarwal) यांनी आज कार्यकरिणी जाहीर केली.

त्यामध्ये सरचिटणीसपदी जितेश कटारिया, गणेश वाशिंबेकर यांची तसेच शहर उपाध्यक्ष पदी कपिल मंडलिक,चिटणीस पदी संजय जमदाडे , विवेक अवसरे ,महिला आघाडी शहराध्यक्षपदी रेणुका राऊत, व्यापार आघाडी शहराध्यक्ष पदी आदेश लूनिया, व्यापार आघाडी सरचिटणीस पदी गोकुळ कुंभार, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष पदी तिरुपती ठोंबरे यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी घनशाम देवी,संजय घोरपडे, नूतन तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, मुन्ना हसीजा, अमरजीत साळुंखे, प्रकाश क्षिरसागर, विनोद इंदलकर,अनिकेत राऊत,निलेश माने, दिपक देवकर यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. निवडी नंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ