Ketaki Chitale | बाजीराव धर्माधिकारी व केतकी चितळे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या; ब्राह्मण संस्थांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

ब्रह्म ऐक्य परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी व अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) यांच्यावर परळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलेला आहे सदर प्रकरणी केतकी चितळे (Ketaki Chitale) यांनी केलेल्या भाषणात ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर कसा होतो याबाबत विवेचन केले होते ज्यामध्ये कोणतेही असंवैधानिक वक्तव्य केलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरतो त्यामुळे तात्काळ हा गुन्हा वापस घेतला गेला पाहिजे अशी मागणी पुणे शहरातील सर्व ब्राह्मण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून केली त्यासोबतच राज्यात विविध ठिकाणी ब्राह्मण समाजाविरुद्ध जातीय द्वेषातून होणाऱ्या घटनांकडे पोलीस विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज बोलून दाखवली.

तीन मिनिटात ब्राह्मण समाजाला संपवण्याची भाषा केली जाते त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे परंतु सदर आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे या करिता पोलिसांनी सहकार्य करावे न्यायालयात योग्यरीत्या बाजू मांडवी अशी विनंती त्यांना करण्यात आली. यावेळी परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी परशुराम सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस ऋषिकेश सुमंत ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ईशानी जोशी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे चंद्रशेखर कुलकर्णी महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे मदन सिन्नरकर सचिन वसगडेकर सुनील कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान