“हा कसला राजा हा तर भिकारी!!”, प्रभू रामांना आपला शत्रू म्हणणाऱ्या नेत्याला बावनकुळेंनी झापलं

DMK Leader A Raja: तामिळनाडूचे डीएमचे नेते ए. राजा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मी रामायण आणि भगवान राम मानत नाही, असे राजाने म्हटले आहे. राजा म्हणाले की, ‘जर हा तुमचा जय श्री राम असेल, जर ही तुमची भारत माता की जय असेल, तर ते जय श्री राम आणि भारत माता की जय तामिळनाडू कधीही मान्य करणार नाही.’ असे द्रमुक नेते म्हणाले. तसेच आम्ही रामाचे शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले. द्रमुक नेत्याच्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडकून प्रत्युत्तर दिले आहे.

हा कसला राजा हा तर भिकारी!! भारत हे एक राष्ट्र नाही, अशी भारतविरोधी भूमिका, ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांचा कधीच स्वीकार करणार नाही, ही राक्षसी महत्वाकांक्षा आणि राम किंवा रामायणावर विश्वास नाही.. असा माज करणारे द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांचे विधान म्हणजे राजाला लागलेले भिकेचे डोहाळे आहेत. हा कसला राजा हा तर भिकारी!! हा भारतीय सभ्यता, परंपरा व आस्थेचा अपमान आहे. वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे दिवटे कर्नाटकचे मंत्री प्रियांक करतात, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.

तसेच पुढे ते म्हणाले, सनातन हिंदू धर्माचा अपमान इंडी आघाडीतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी करतात… आणि आत्ता ए. राजा यांनी हद्दच केली. राष्ट्रविरोधी विधान करून आमचे आराध्य प्राणप्रिय प्रभू श्रीराम, रामायण आणि महावीर हनुमंताचे अस्तित्व नाकारण्याचा नतद्रष्टपणा केला.

उद्धव ठाकरेजी, हेच आहेत ना तुमचे मित्र आणि नवे नेते.. सावरकरांचा अपमान तुम्ही मिंधे होऊन सहन केला. आता भारतमाता, प्रभू श्रीराम, रामायण आणि हनुमानाचा अपमान तुमचे निर्लज्ज सवंगडी करू लागले…यासाठीच तुम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली, बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब लिहू दिले. अरेरे, तुमच्याबद्दल आता कणव वाटू लागली आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंनाही रडारवर घेतले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान