तरुण दिसण्यासाठी मी विष्ठा सुद्धा खायला तयार आहे; अभिनेत्रीचे धक्कादायक विधान

न्यूयॉर्क –  प्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटी किम कार्दशियन (Famous Hollywood celebrity Kim Kardashian) अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी फॅशनमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा किम एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच, किम कार्दशियनने न्यूयॉर्क टाइम्सला (New York Times) एक मुलाखत दिली, ज्यामध्ये 41 वर्षीय अभिनेत्रीला विचारण्यात आले की ती तरुण दिसण्यासाठी काय करू शकते, ज्यावर किमने उत्तर दिले की मी यासाठी काहीही करेन.

ती म्हणाली,  जर तुम्ही मला सांगितले की मला तरुण दिसण्यासाठी रोज विष्ठा खावी लागेल, तर कदाचित मी ते देखील करू शकते. किमच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.किम कार्दशियनच्या या उत्तरानंतर तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोक तिला वेड लागले आहे असं म्हणत आहेत आणि ट्रोल करत आहेत.

सध्या आपल्या पहिल्या लग्नापासून घटस्फोट घेतल्यानंतर किम आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या कॉमेडियन पीट डेव्हिडसनला (Pete Davidson)  डेट करत आहे. किम कार्दशियनने पहिले लग्न प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट सोबत (Famous rapper Kanye West) केले, कान्ये आणि किम यांना चार मुले आहेत. अलीकडेच किमने तिची नवीन ब्युटी लाइन आणि परफ्यूम ब्रँडही लॉन्च केला आहे.