तुम्ही गेले हाच मोठा गौप्यस्फोट, आता… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किशोरी पेडणेकरांचा टोला

Mumbai – माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हटलं आहे.एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना निर्वाणीचा इशाराच दिला आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी कोणी केली? बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो, त्यांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? आपल्याला मत देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कोणी केली? हे सर्व आम्ही बोलू शकतो. सध्या मी सज्जन भाषेत बोलत आहे. पण यावर मी नक्की बोलणार आहे , असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देताना  माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ तुमच्या जाण्यानेच मोठा गौप्यस्फोट झाला. यापेक्षा अजून काय स्फोट करणार… भाजपाला जे पाहिजे, ते देण्याची कृपा करू नका. काय बोलायचे ते बोलू देत. मग जनता ठरवेल, स्फोट आहे की आणखी काही आहे…