Kuldeep Yadav | गुजरातविरुद्धच्या सामन्यात कुलदीपचा संयम सुटला, सहकाऱ्यावर ओरडला, पंतने केले शांत

Kuldeep Yadav | गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या कमी धावसंख्येच्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून पराभव करत गुणतालिकेत सहावे स्थान मिळविले. त्याचबरोबर गुजरातचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, सामन्यादरम्यान दिल्लीचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) संयम सुटला आणि तो सहकारी खेळाडू मुकेश कुमारवर ओरडताना दिसला. मात्र, यावेळी संघाचा कर्णधार ऋषभ पंत कुलदीपला शांत करताना दिसला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली
या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी करत गुजरातला 89 धावांवर ऑलआउट केले. प्रत्युत्तरात दिल्लीने 67 चेंडू बाकी असताना सहा विकेट्स राखून लक्ष्य गाठले. गुजरातचे फलंदाज दिल्लीविरुद्ध झुंजताना दिसले आणि आठव्या क्रमांकावर आलेल्या रशीद खानशिवाय एकाही फलंदाजाला 15 धावांचा पल्ला गाठता आला नाही. दिल्लीकडून मुकेश कुमारने तीन बळी घेतले. त्याचवेळी इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सने प्रत्येकी दोन, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

कुलदीपला मुकेशने चेंडू फेकल्याचा राग आला
यादरम्यान कुलदीप गोलंदाजी करत असताना मुकेशने त्याच्या षटकात त्याच्या दिशेने थ्रो फेकला, त्यावर कुलदीप संतापला आणि म्हणाला, ‘वेडा आहेस का?’ मात्र, दिल्लीचा कर्णधार पंत त्याच्या दिशेने आला आणि म्हणाला, ‘राग नाही, राग नाही’. कुलदीपचे हे वक्तव्य स्टंप माइकवर रेकॉर्ड झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरातच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवला
यासह गुजरात टायटन्सच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या करणारा गुजरात हा पहिला संघ ठरला आहे. याशिवाय आयपीएलमध्ये गुजरातची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात