कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्याने देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; भाजप प्रवेशाच्या चर्चांना आले उधाण 

Nagpur News : विदर्भात कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चिन्हे आता स्पष्ट दिसू लागली आहेत. कारण काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

एक तास चाललेल्या या भेटीनंतर फडणवीस आणि बावनकुळे काहीही बोलले नसले तरी आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती, फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते अशी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, आजच्या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. राजकारणापलिकडे फडणवीस आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत. फडणवीस हे चांगलं काम करणारे नेते आहेत. त्यांच्या कामाचं मी कौतुक करतो. अमित शाह हे देशाचे कार्यक्षम गृहमंत्री आहेत, अशा शब्दात देशमुख यांनी फडणवीस आणि शाह यांचं कौतुक केलं आहे.