Lok Sabha Election | राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यास शिवाजीराव आढळराव पाटील तयार ?

Lok Sabha Election – शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalarao ) यांची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) कडून लढण्याची आपली तयारी असल्याचे संकेत मिळू लागले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यात आता म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून लोकसभा लढविणारच (Lok Sabha Election) असा निर्धार व्यक्त केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दरम्यान, जुन्या शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत आम्हाला ‘अभिनेता नको तर नेता खासदार हवा’ अशा घोषणा देत निवडणूक लढविण्याची विनंती पाटील यांना केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यास शिवाजीराव आढळराव तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील हे जर कोल्हे यांच्या विरोधात मैदानात असतील तर हि लढत लक्ष्यवेधी बनणार याबाबत कोणतीही शंका नाही.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’