Amit Shah | राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा; अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील 6 मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत श्री.शाह बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निवडणूक व्यवस्थापन समिती, लोकसभा कोअर कमिटीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शाह यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर या मतदारसंघांतील पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा  घेतला.

यावेळी शाह (Amit Shah) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे लागेल. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आणि विकासकामांच्या आधारावर मते मागायची आहेत. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क प्रस्थापित करावा.

आपला उमेदवार विजयी होण्यासाठी प्रत्येक बूथ सशक्त करण्यासाठी आपणा सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे, असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. महायुतीचा उमेदवार हा भाजपाचाच उमेदवार आहे असे समजून एकदिलाने महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी अहोरात्र काम करा असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एनडीए विजयी होणे आवश्यक असल्याचे मतदारांना पटवून दिले पाहिजे, असेही शाह यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान