Rajnath Singh | भारताची ताकत वाढली; संरक्षण मंत्रालयानं पाच कंपन्यांसोबत 39 हजार 125 कोटी रुपयांचे खरेदी करार

Rajnath Singh – मेक इन इंडिया (Make in India) मोहिमेला बळ देण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं पाच कंपन्यांसोबत 39 हजार 125 कोटी रुपयांचे खरेदी करार केले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण सचिव गिरीधर अरामाने यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.

हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून (Hindustan Aeronautics) मिग-29 विमानांसाठी एअरो इंजिन्सच्या खरेदीसाठी करार करण्यात आला आहे, तर लार्सन अँड टुब्रो लिमिटेडशी उच्च क्षमतेची रडार यंत्रणा, तसंच घेराव घालण्यासाठी शस्त्र यंत्रणा यांच्या खरेदीसाठी दोन स्वतंत्र करार करण्यात आले आहेत.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या तसंच समुद्रावरून मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी ब्राह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडशी दोन करार करण्यात आले आहेत. या करारांमुळे स्वदेशी निर्मितीच्या क्षमतेला बळ मिळेल, परकीय चलन वाचेल आणि खरेदीसाठी परदेशी उत्पादकांवर अवलंबून राहणं कमी होईल असं संरक्षण मंत्रालयानं (Rajnath Singh) म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’