Loksabha Election | माढा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार; शरद पवार गटाचा दावा 

मुंबई : माढा लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघाच्या जागेवरनं अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी फुटणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapse) यांनी केला आहे.

माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांच्या वाहनावर गाजरांचा वर्षाव त्यांच्याच मतदारांनी केल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिलं. त्यातच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या परिवाराचा सक्तविरोध खासदार निंबाळकर यांना असल्यामुळे ते वेगळी भूमिका घेतील असा दावा महेश तपासे यांनी केला.

अबकीबार ३७० पार च्या घोषणा देणाऱ्यांची पहिली यादी घोषित होताच उमेदवार पवन सिंग यांनी माघार घेतली व माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दवाखान्याचे शटर उघडलं आणि राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. प्रगत देशांमध्ये ईव्हीएम वर सरसकट बंदी आहे व बॅलेट वरच तिथे मतदान होत. पंतप्रधान मोदींनी खरंच जर भारतामध्ये गेल्या दहा वर्षात विकास केला असेल तर बॅलेट पासून त्यांना एवढी भीती कशासाठी? असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

वन नेशन वन इलेक्शन (Loksabha Election) च्या माध्यमातून देशाची संसदीय लोकशाही प्रक्रिया मोडून काढण्याचा भाजपचा डाव असल्याचे तपासे म्हणाले.महायुतीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची किंमत शून्य असल्या ची टीका महेश तपासे यांनी केली त्यामुळेच आठवले व्यथित आहेत. त्यांच्या पक्षाला एकही जागा महायुती सोडणार नाही व भविष्यात आठवले यांना राज्यसभेची संधी उपलब्ध होणार नाही असेही महेश तपासे म्हणाले.

बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha Constituency) संघात संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जनसामान्य जनता ही सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत आहे. सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा हा मतदारसंघ सर करतील हे निर्विवाद सत्य आहे असा ठाम विश्वास तपासे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान