माँ कालीच्या वादग्रस्त पोस्टर प्रकरणी दिल्ली आणि यूपीमध्ये गुन्हा दाखल

नवी दिल्ली :  माँ कालीच्या (Ma Kaali Movie Poster) वादग्रस्त पोस्टर प्रकरणी दिल्ली आणि यूपीमध्ये एफआयआर (FIR)दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने माँ काली पोस्टर प्रकरणी कलम 153A आणि 295A अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांना काली माँच्या पोस्टर वादाच्या दोन तक्रारी आल्या होत्या. एक तक्रार नवी दिल्ली आणि एक तक्रार IFSO ला देण्यात आली होती.

https://twitter.com/LeenaManimekali/status/1543200394477805568?s=20&t=5m9Q8PZotlj6MElr8REFxA

सध्या, IFSO युनिटने हे चित्र पोस्ट करणाऱ्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekali)यांच्या विरोधात IPC 153A  आणि IPC 295A (कोणत्याही वर्गाच्या, धर्माच्या भावना भडकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी नवी दिल्ली पोलिस अद्याप नवी दिल्ली जिल्ह्याच्या तक्रारीवरून तपास करत आहेत. आवश्यक असल्यास, IFSO युनिट संचालकांशी ईमेल किंवा सूचनेद्वारे संपर्क करेल.

यूपीमध्येही गुन्हा दाखल.

माँ कालीच्या वादग्रस्त पोस्टर प्रकरणी यूपी पोलिसांनी (UP Police)’काली’ चित्रपटाची (Movie)निर्माती लीना मनिमेकलाई यांच्या विरोधातही एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये हिंदू देवतेचे अपमानास्पद चित्रण करण्यात आले असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाद काय आहे ?कॅनडामध्ये मां कालीचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये मां काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे आणि पोस्टरमध्ये तिच्या हातात LGBTQ प्राईड झेंडा देखील आहे. या पोस्टरमुळे भारतात खळबळ उडाली आहे. हे पोस्टर फिल्ममेकर लीना मनिमेकलाई यांच्या डॉक्युमेंट्री फिल्म ‘काली’चे आहे. या वादानंतर सोशल मीडियावर लोक फिल्ममेकर लीना यांच्यावर जोरदार टीका करत आहेत आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. पोस्टर 2 जुलै रोजी रिलीज करण्यात आले आणि कॅनडामध्ये आयोजित ‘अंडर द टेंट’ प्रकल्पाचा भाग म्हणून प्रदर्शित करण्यात आले. टोरंटो येथील आगा खान संग्रहालयात हा प्रकल्प प्रदर्शित करण्यात आला.

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी आक्षेप घेतला

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. हाय कमिशनने सांगितले की, हिंदू समुदायाकडून (Hindu community) त्यांना तक्रारी मिळाल्या आहेत की कॅनडामध्ये अंडर द टेंट (Under The Tent Canada)प्रकल्पांतर्गत एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, ज्यामध्ये हिंदू देवतांची विटंबना करण्यात आली आहे. आम्ही कार्यक्रमाच्या आयोजकांकडे आमची चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.